torsdag 25 september 2014

Day 5 -

आज २० सप्टेंबर

शनिवार असल्याने उठायची घाई नाही. एकदम निवांत होतो. पुण्यात बऱ्याच मित्र मैत्रिणींना फोन झाले.  Laptop वर Jab we met सिनेमा बघून झाला. मी ज्या apartment मध्ये राहतोय तिथेच आमच्या टीम मधला मनोहर सोनावणे पण राहतोय. त्याच्याबरोबर जेवलो आणि फिरायला बाहेर पडलेलो. बोटीतून फेरी मारून आलो. त्याने पहिल्यांदा हि फेरी अनुभवली.

एखादा माणूस एखादी गोष्ट पहिल्यांदा अनुभवत असतो तेंव्हा त्याच्या चेहऱ्यावरचे भाव जास्त अनुभवण्यासारखे असतात.

एका शॉपिंग सेंटर मध्ये पण चक्कर मारून आलो. ice cream घेऊन आलो त्यामुळे जेवणा नंतरची स्वीट डिश ची सोय झाली :)
झोपताना पुण्यातले पेपर वाचत होतो. हा जागावाटपाचा तिढा काही सुटत नाही असा दिसतंय. अवघड आहे
असो … शुभरात्री …  उद्या रविवार :) 

Inga kommentarer:

Skicka en kommentar