torsdag 18 september 2014

Day 3 -

आज 18 सप्टेंबर
आज ऑफिस मध्ये टीम मेंबरने पूर्ण ऑफिस दाखवले. अप्रतिम ऑफिस आहे. workplace असावी तर अशी.
आज घरून डबा घेऊन गेलेलो. संध्याकाळी पण जरा पाककौशल्य आजमावले, हळू हळू जमतंय.
आज एका Indian grocery shop मधून दह्याचा मोठा box आणलाय त्यामुळे उद्या पासून ऑफिस ला दही भात सुरु :)

आमच्या ऑफिस चे काही फोटो -









onsdag 17 september 2014

Day 2 
 
आज 17 सप्टेंबर
आज नवीन कंपनी मधे (क्लाइंट साइटला) पहिला दिवस होता. बरोब्बर वेळेत पोचलो होतो. आजचा दिवस फॉरमॅलिटीस मधेच गेला. टीम शी ओळख झाली (वय वर्ष 50 च्या खालच कोणीही नाहीये टीम मधे .. सर्व सीनियर सिटीझन) नवीन लॅपटॉप मिळाला. लंच साठी जवळच्या हॉटेल मधे गेलेलो. शाकाहारी असण किती वाईट असत याचा परत अनुभव आला. 70 SEK म्हणजे 630 रुपये देऊन ब्रेड खाऊन उठाव लागल. असो उद्या पासून डबा नेणे भाग आहे. 
आत्ता ज्या हॉटेल मधे राहतोय ते 2 आठवड्यात खाली करायचं आहे. त्यामुळे उद्या पहिले फ्लॅट शोध मोहीम हाती घ्यावी लागणार.  
शुभरात्री 
Day 1 - 

आज 16 सप्टेंबर.
पहिला दिवस पुर्ण प्रवासातच गेला. टर्किश Airline ने आलो, Istanbul ला 4 तास थांबलो होता.. प्रचंड बोर झालो पण काय करणार. आता सवय करून घ्यायला हवी .. Arlanda Airport वरून टॅक्सी पकडून घरी आलो. बरोब्बर एक वर्षानी येतोय स्टॉकहोम मधे. खूप छान वाटतय. इथला उन्हाळा अजून संपला नाहीये. 6 पर्यंत लक्ख उन होत, हे शहर वेड लावत !!!
घरी सुखरूप पोचल्याचा फोन झाला....बांधून आणलेले पराठे आणि सांज्याची पोळी खाऊन झाली
आता झोपतो .. उद्या नवीन कंपनी मधे पहिला दिवस :)
नमस्कार

ऑफिसच्या कामासाठी सध्या स्वीडनला (स्टॉकहोम) आलोय. जवळ जवळ 6 महिने इथे असणार आहे. हि माझी स्वीडनची पाचवी ट्रिप आहे. पहिल्या चारही ट्रिप नंतर स्वीडन वर काहीतरी लिहाव अस डोक्यात होत पण आळस ....
या वेळेस दैनंदिनीच लिहावी असा ठरवून हा ब्लॉग सुरु करतोय. 

रोज एक ओळ का होईना पण लिहावी अस डोक्यात आहे. तस रोजच्या रोज लिहिण्यासारखं काही घडणार आहे अश्यातला भाग नाही पण हात लिहिता रहावा हा एक हेतू आहे. 165 दिवस एकटा राहणार आहे. रोज स्वतःला स्वयंपाक करायचा आहे. खूप लोकांना, खूप सणांना आणि खूप क्षणांना मीस करणार आहे पण बरच काही कमावणार पण आहे.

काय गमावतोय, काय कमावतोय हे तुम्हाला या दैनंदिनितून वाचयला मिळेलच. कदाचित माझ बोट धरून थोड फार स्टॉकहोम  पण फिरता येईल तुम्हाला  आणि हो .. माझी दैनंदिनी असल्याने थोडासा पर्सनल पण लिहिलेला असू शकेल ... ज्या अर्थी तुम्ही हा ब्लॉग वाचताय त्या अर्थी तुम्ही माझ्या जवळचे आहात एवढे नक्की :) 

चला तर मग ...  165  दिवसांच्या या लेखन प्रकल्पाला सुरवात करतो .. बघू किती दिवस टिकतोय उत्साह. एक गोष्ट नक्की, खरच रोजच्या रोज ही डायरी लिहिली गेली तर सर्वात जास्त आनंद मलाच होईल, आयुष्याच्या संध्याकाळी एखाद्या कातरवेळी हा ब्लॉग वाचायला फार मजा येईल 

असो .. शुरु किया जाये