torsdag 2 oktober 2014

Day 13 -


आज २८ सप्टेंबर
रविवार , सर्वांचा आवडता रविवार …. आमचा खरेदीचा दिवस
सकाळी छान नाश्ता करून बाहेर पडलो आणि पेन्दल ट्रेन ने (लांबच्या अंतराची ट्रेन) बार्कार्बी नावाच्या जागी गेलो. तिथे IKEA नावाचे एक खूप मोठे दुकान आहे ज्यात घरासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू मिळतात. IKEA हा स्वीडन चा ब्रांड आहे आणि आता जगभर प्रसिद्ध झाला आहे. टाचणी पासून सोफ्यापर्यंत सर्व वस्तू एकदम वेगळ्या पद्धतीच्या बघायला मिळतात (सर्वच परवडतात अश्यातला भाग नाही)
इथले lamp चे आणि मेण बत्याचे आणि घड्याळांचे section खूप सुंदर आहेत. आम्ही खूप खरेदी केली . कोणी उश्या घेतल्या तर कोणी एकदम वेगळ्या पद्धतीचे दिवे घेतले . मी सर्व शोपिंग फेब्रुवारी मध्ये करण्याचे ठरवले आहे.
तिथून मग स्टोकहोम quality outlet नावाच्या mall मध्ये गेलो तिथे मी tshirts आणि जिम साठी बूट घेतले (त्यासाठी तरी जिम ला जाईन म्हणतो)
तर अश्या तऱ्हेने आजचा पूर्ण दिवस खरेदी करण्यात गेला. सर्वांनी मनसोक्त खरेदी केली आणि अनघा पूजा ला IKEA ची एक झलक बघता आली.
शनिवार रविवार सकाळचे जेवण MacD मध्ये झाले आणि रात्री मनोहर च्या हातच्या जेवणाने मजा आणली  :)
विकेंड संपला पण ….  उद्या ऑफिस  … शुभरात्री
Day 12 -

आज २७ सप्टेंबर
शनिवार …. सकाळीच घरच्यांना फोन झाला आणि आम्ही चौघं बाहेर पडलो. अनघा आणि पूजा पहिल्यांदाच आल्या आहेत स्वीडनला. मनोहर तिसऱ्यांदा आलय पण त्याचे फारसे फिरून झाले नाहीये. आज त्या तिघांना घेऊन पहिले ग्लोबेन नावाच्या जागेवर गेलो. तिथे काचेची लिफ्ट आहे गोल आकाराची ज्याने खूप उंचावर जाऊन शहर बघता येते

त्या नंतर skansen नावाच्या open air musium बघून आलो.  तिथे बर्फाळ प्रदेशातले बरेच प्राणी आहेत आणि जुन्या पद्धतीची स्वीडिश घरे पण आहेत. खूप उंचावर आणि खूप सुंदर अशी हि जागा आहे

सर्वात महत्वाचे म्हणजे आजे cruise ट्रीप बुक केली. १० ऑक्टोबर च्या शुक्रवारी आम्ही जहाजाने तालीन (इस्टोनिया ची राजधानी) ला जाणार आहोत. मी आयुष्यात पहिल्यांदा जहाजाने प्रवास करणार :)

ग्लोबेन आणि स्कांसेन चे काही फोटो -
 
Day 11

आज २६ सप्टेंबर
आला शुक्रवार आला. तस काही आठवडाभर मानेवर खडा ठेऊन काम केले नाहीये पण शुक्रवार आला कि मनाला बर वाटत. खर तर माझं काम अजून सुरु झालच नाहीये. Knowledge Trasfer म्हणजे शिकवणीच चालूये अजुन. कदाचित पुढच्या आठवड्यापासून काम चालू होईल. आज एक घर बघून आलोय. चांगल वाटतंय. लगेच होकार पण कळवला आहे. बघुयात ते काय म्हणतायेत. त्याच घरासमोर जिम ची पण चौकशी करून आलोय. (जिम ची चौकशी करण्यात जेवढा उत्साह दाखवतो तेवढा जिम लावल्यावर दाखवला तर ……… )
रोज घरी फोन होतोय
whats app मुळे पुण्यातल्या मित्रमैत्रिणींशी संपर्कात आहे. जग जवळ आलंय म्हणजे काय ते आत्ता कळतंय.
चला खूप उशीर झालाय ….  झोपतो … विकेंड चा चांगला plan केलेला आहे :)
शुभरात्री
Day 10


आज २५ सप्टेंबर
रोजच्यासारखे हॉटेल ते ऑफिस आणि ऑफिस ते हॉटेल चालूये.
रोजच्याप्रमाणे डब्यात ब्रेड आणि दही भात आहे.
रोजच्याप्रमाणे आजही जागेचे फायनल होऊ शकले नाहीये.
शुभरात्री
Day 9


आज २४ सप्टेंबर
नव्याचे नऊ दिवस संपले असे म्हणायला हरकत नाही. घराचा प्रश्न मात्र अजून सुटला नाहीये. या आठवड्यात काही करून ते मार्गी लावलेच पाहिजे. बाकी ऑफिस आणि हॉटेल जैसे थे. आज भारताने पाठवलेले यान मंगळावर पोचले. अभिमानाची गोष्ट आहे. मी आत्ता ज्या देशात आहे त्यांनी कदाचित आत्तापर्यंत एक पण satelite launch केले नसेल पण या देशात एक पण बस किंवा ट्रेन लेट नसते. जास्त अभिमानाची गोष्ट कुठली हे ज्याचे त्याने ठरवावे. आपण आकाशाला गवसणी घातलीये आता रस्त्यावर लक्ष दिले पाहिजे.
असो
शुभरात्री
Day 8 -


आज २३ सप्टेंबर
आता ऑफिस मध्ये रुळलोय असा म्हणायला हरकत नाही. घरून आणलेले पदार्थ आता संपले आहेत त्यामुळे स्वतः डबा बनवणे चालू झालंय. आज डब्यात Sandwich आणि दही भात होता. रात्रीच्या जेवणाला सध्या कंपनी मिळत आहे. पुण्याहून आलेले मनोहर , पूजा आणि अनघा असतात रोज जेवायला त्यामुळे वेळ कसा जातो कळत नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मला स्वतःला फार काही बनवावे लागत नाही. आज या पाहुणे लोकांना मेट्रो मधून चक्कर मारून आणली. स्वीडन च्या Public Transport ला सलाम आहे.
शुभरात्री