Day 13 -
आज २८ सप्टेंबर
रविवार , सर्वांचा आवडता रविवार …. आमचा खरेदीचा दिवस
सकाळी छान नाश्ता करून बाहेर पडलो आणि पेन्दल ट्रेन ने (लांबच्या अंतराची ट्रेन) बार्कार्बी नावाच्या जागी गेलो. तिथे IKEA नावाचे एक खूप मोठे दुकान आहे ज्यात घरासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू मिळतात. IKEA हा स्वीडन चा ब्रांड आहे आणि आता जगभर प्रसिद्ध झाला आहे. टाचणी पासून सोफ्यापर्यंत सर्व वस्तू एकदम वेगळ्या पद्धतीच्या बघायला मिळतात (सर्वच परवडतात अश्यातला भाग नाही)
इथले lamp चे आणि मेण बत्याचे आणि घड्याळांचे section खूप सुंदर आहेत. आम्ही खूप खरेदी केली . कोणी उश्या घेतल्या तर कोणी एकदम वेगळ्या पद्धतीचे दिवे घेतले . मी सर्व शोपिंग फेब्रुवारी मध्ये करण्याचे ठरवले आहे.
तिथून मग स्टोकहोम quality outlet नावाच्या mall मध्ये गेलो तिथे मी tshirts आणि जिम साठी बूट घेतले (त्यासाठी तरी जिम ला जाईन म्हणतो)
तर अश्या तऱ्हेने आजचा पूर्ण दिवस खरेदी करण्यात गेला. सर्वांनी मनसोक्त खरेदी केली आणि अनघा पूजा ला IKEA ची एक झलक बघता आली.
शनिवार रविवार सकाळचे जेवण MacD मध्ये झाले आणि रात्री मनोहर च्या हातच्या जेवणाने मजा आणली :)
विकेंड संपला पण …. उद्या ऑफिस … शुभरात्री

Inga kommentarer:
Skicka en kommentar