Day 2
आज 17 सप्टेंबर
आज नवीन कंपनी मधे (क्लाइंट साइटला) पहिला दिवस होता. बरोब्बर वेळेत पोचलो होतो. आजचा दिवस फॉरमॅलिटीस मधेच गेला. टीम शी ओळख झाली (वय वर्ष 50 च्या खालच कोणीही नाहीये टीम मधे .. सर्व सीनियर सिटीझन) नवीन लॅपटॉप मिळाला. लंच साठी जवळच्या हॉटेल मधे गेलेलो. शाकाहारी असण किती वाईट असत याचा परत अनुभव आला. 70 SEK म्हणजे 630 रुपये देऊन ब्रेड खाऊन उठाव लागल. असो उद्या पासून डबा नेणे भाग आहे.
आत्ता ज्या हॉटेल मधे राहतोय ते 2 आठवड्यात खाली करायचं आहे. त्यामुळे उद्या पहिले फ्लॅट शोध मोहीम हाती घ्यावी लागणार.
शुभरात्री
Inga kommentarer:
Skicka en kommentar