नमस्कार
ऑफिसच्या कामासाठी सध्या स्वीडनला (स्टॉकहोम) आलोय. जवळ जवळ 6 महिने इथे असणार आहे. हि माझी स्वीडनची पाचवी ट्रिप आहे. पहिल्या चारही ट्रिप नंतर स्वीडन वर काहीतरी लिहाव अस डोक्यात होत पण आळस ....
या वेळेस दैनंदिनीच लिहावी असा ठरवून हा ब्लॉग सुरु करतोय.
रोज एक ओळ का होईना पण लिहावी अस डोक्यात आहे. तस रोजच्या रोज लिहिण्यासारखं काही घडणार आहे अश्यातला भाग नाही पण हात लिहिता रहावा हा एक हेतू आहे. 165 दिवस एकटा राहणार आहे. रोज स्वतःला स्वयंपाक करायचा आहे. खूप लोकांना, खूप सणांना आणि खूप क्षणांना मीस करणार आहे पण बरच काही कमावणार पण आहे.
काय गमावतोय, काय कमावतोय हे तुम्हाला या दैनंदिनितून वाचयला मिळेलच. कदाचित माझ बोट धरून थोड फार स्टॉकहोम पण फिरता येईल तुम्हाला आणि हो .. माझी दैनंदिनी असल्याने थोडासा पर्सनल पण लिहिलेला असू शकेल ... ज्या अर्थी तुम्ही हा ब्लॉग वाचताय त्या अर्थी तुम्ही माझ्या जवळचे आहात एवढे नक्की :)
चला तर मग ... 165 दिवसांच्या या लेखन प्रकल्पाला सुरवात करतो .. बघू किती दिवस टिकतोय उत्साह. एक गोष्ट नक्की, खरच रोजच्या रोज ही डायरी लिहिली गेली तर सर्वात जास्त आनंद मलाच होईल, आयुष्याच्या संध्याकाळी एखाद्या कातरवेळी हा ब्लॉग वाचायला फार मजा येईल
असो .. शुरु किया जाये

Inga kommentarer:
Skicka en kommentar